काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत
वक्तव्य केल्यानंतर आज राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात
येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर यांसह संपूर्ण महाराष्ट्रात
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात
मोठ्या घोषणाबाजीही करण्यात आल्या. मुंबईत घाटकोपर परिसरात
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार
यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी राहुल
गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, अन्यथा आमचे आंदोलन सुरुच
राहील, अशी मागणी केली. पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांनी घाटकोपर
मधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींनी
केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. “आम्ही राहुल गांधींचा धिक्कार
आणि निषेध करतो. राहुल गांधी हे जोपर्यंत माफी मागत नाही, तोवर आमचे आंदोलन
सुरु राहील. त्यांनी आपल्या संविधनाचा अपमान केला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी
स्पष्टीकरण द्यायला हवं. राहुल गांधी यांच्या विधानाचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी
महाराज यांचा पुतळा पडला, तेव्हा मोदींनी माफी मागितली, आता राहुल गांधी यांनी
संविधानाचा अपमान केला आहे, त्याची त्यांनी माफी मागावी. यावर मनोज जरांगे काय
बोलतात, त्यासाठी मी उत्सुक आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-leader-nitish-ranes-controversial-legislation-to-treat-only-hindus/