बिर्ला गेटजवळ इलेक्ट्रिक वायर पडल्याने मजूर गंभीर जखमी

बिर्ला गेटजवळ इलेक्ट्रिक वायर पडल्याने मजूर गंभीर जखमी

अकोला: अकोल्यातील बिर्ला गेटजवळ, मसणे हॉस्पिटलच्या बाजूला,

दुर्दैवी अपघात घडला आहे. सलाम नगर येथील शेख जावेद शेख याकूब

हे बांधकाम मजूर आज सकाळी काम करत असताना

अचानक एमएसईबीचा विद्युत वायर त्यांच्यावर कोसळला.

या दुर्घटनेत त्यांच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर नागरिकांनी शेख जावेद यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी दोन्ही हाताला गंभीर जखमा झाल्याचे सांगितले.

पीडित शेख जावेद म्हणाले, “मी रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

अचानक वायर अंगावर पडल्यामुळे माझे हात जखमी झाले आहेत.

एमएसईबीने मला तातडीने मदत करावी.”

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले की, अशा घटना वारंवार घडत असून जीवितहानी टाळण्यासाठी एमएसईबीने तातडीने उपाययोजना कराव्यात.

अपघातानंतर शेख जावेद यांच्यावर उपचार सुरू आहेत,

मात्र अशी घटना पुन्हा कोणासोबत होऊ नये यासाठी अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावी,

अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/auspicious-current-newly-constructed-ganeshotsav-mandal-bazarpura-cha-social-undertaking-yanda-special-attraction/