पक्षी सप्ताह साजरा

पक्षी सप्ताह साजरा
चान्नी येथील जय बजरंग विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयात दिनांक ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान देशभर आयोजित पक्षीसप्ताह निमित्त दिनांक १० नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना परिसरातील पक्षांची माहिती आणि ओळख करून देण्यात आली. संतुलित पर्यावरणात पक्षांचे मोलाचे स्थान आहे या विषयी त्यांना पर्यावरण शिक्षक गणेश कालापाड यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले. पर्यावरण शिक्षक आणि पक्षीप्रेमी गाडगे सर यांनी स्वतः काढलेल्या पक्षांच्या छायाचित्रांच्या आधारे विद्यार्थ्यांना परिसरातील विविध पक्षांची ओळख करून दिली . इको क्लब चे शिक्षक संजय जायभाये यांनी आपल्या प्रमाणेच पशू, पक्षी व संपूर्ण जीवसृष्टीला जगण्याचा अधिकार आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना “ई बर्ड” या आप्लिकेशनचा वापर करून परिसरातील पक्षांच्या नोंदी कशा कराव्या याबद्दल माहिती देण्यात आली. पक्षी संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी अंगणात झाडे लावणे, शेताच्या बांधावरील झाडे न कापणे , रासायनिक कीटक नाशकांचा वापर न करणे असे सोपे उपाय शिक्षक वसंत ढोकणे यांनी सुचविले. प्राचार्य संग्राम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला.

read also : https://ajinkyabharat.com/2025-after-the-delhi-blast-pakistan-got-scared-and-the-effect-of-increasing-tension-was-increased-by-3-decisions/