Bigg Boss Marathi 6 Episode 18: सागर कारंडेचा धक्कादायक डबल गेम! 7 मोठे ट्विस्ट ज्यांनी घर हादरलं

Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6: सागर कारंडेचा डबल गेम उघड, ‘टोळी’त सामील झाला कॉमेडियन; घरात नवी समीकरणं, कॅप्टन्सी टास्कमध्ये ऐतिहासिक ट्विस्ट

Bigg Boss Marathi 6 च्या 28 जानेवारी 2026 रोजी प्रसारित झालेल्या 18व्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त ड्रामा, नवीन गेमप्लॅन, भावनिक क्षण आणि राजकारणाचा भन्नाट खेळ पाहायला मिळाला. Bigg Boss Marathi 6 घरातली समीकरणं पूर्णपणे बदलून टाकणारा हा भाग ठरला. ‘प्यादे’ ते ‘वजीर’ असा खेळ, सेवकांची नेमणूक, सागर कारंडेचा कथित डबल गेम, सचिनचा भावनिक ब्रेकडाऊन आणि दोन कॅप्टन असलेला ऐतिहासिक टास्क – या सगळ्यामुळे घरातील वातावरण अक्षरशः तापलं.

टीम A विरुद्ध टीम B: ‘प्यादे’ ठरवण्याचा धक्कादायक निर्णय

भागाच्या सुरुवातीलाच बिग बॉस मोठी घोषणा करतात. बहुमताने टीम A ने टीम B मधील ओमकार आणि राकेश यांना ‘प्यादे’ ठरवलं, तर टीम B ने टीम A मधून विशाल आणि रुचिता यांची निवड केली. या चौघांचं घरातील गेममध्ये फारसं योगदान नाही, असा ठपका त्यांच्या विरुद्ध टीमने ठेवला.

पण हा खेळ इथेच थांबला नाही. Bigg Boss Marathi 6 घरातील एक गूढ दार उघडतात आणि सांगतात की, या दाराआड ‘प्यादे’ ठरलेल्या सदस्यांना खेळ पालटण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Related News

प्यादे झाले वजीर: बुद्धीबळाचा डाव

या चौघांना बुद्धीबळातील प्याद्याची प्रतिकृती दिली जाते, ज्यामध्ये एक चावी लपवलेली असते. ती चावी घेऊन ते ‘चेकमेट’ खोलीत जातात. बिग बॉस स्पष्ट करतात की, जसं बुद्धीबळात शेवटी प्यादं वजीर बनतं, तसंच हे चारही सदस्य आता ‘वजीर’ झाले आहेत.

वजीर बनल्यानंतर त्यांना अधिकार मिळतो – विरुद्ध टीममधील इतर सदस्यांना प्यादं ठरवण्याचा. ज्यांचं नाव घेतलं जाईल, ते कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद होतील आणि घराचे ‘सेवक’ बनतील.

Bigg Boss Marathi 6 घराला मिळाले चार सेवक, वादांची ठिणगी

या टास्कमध्ये

  • विशाल दिव्याचं नाव घेतो

  • राकेश अनुश्रीचं

  • रुचिता तन्वीचं

  • आणि ओमकार रोशनचं नाव घेतो

रोशनचं नाव घेतल्यावर ओमकार आणि रोशनमध्ये मोठा वाद होतो. ओमकार-रुचिता यांच्यातही जोरदार खडाजंगी पाहायला मिळते.

परिणामी दिव्या, अनुश्री, तन्वी आणि रोशन हे चौघे घराचे सेवक बनतात. त्यांच्या हातात ‘सेवक’ असं लिहिलेलं बँड दिलं जातं. बिग बॉस आदेश देतात की, घरातील सर्व कामं हीच चौघं करतील आणि कोणीही त्यांना मदत करू शकणार नाही.

सेवकांची कसोटी: रोशनचा परफॉर्मन्स, तन्वी-अनुश्रीचा ड्रामा

दुसऱ्या दिवशी रोशन सर्वाधिक काम करताना दिसतो. किचन साफ करणं, झाडलोट, इतर घरकामं – रोशन अक्षरशः झोकून देऊन काम करतो. दिव्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की, इतर सदस्यांकडूनही काम करून घेतलं पाहिजे, पण रोशन स्पष्टपणे सांगतो की, “मला जेवढं करायचंय तेवढं मी करणार.”

दुसरीकडे, तन्वी आणि अनुश्री कामावरून ड्रामा करताना दिसतात. अनुश्री झोपून राहते, तर तन्वी अट घालते की, इतर सदस्यांनी झुकझुक गाडी खेळली तरच ती काम करेल. या प्रकारामुळे घरात चिडचिड वाढते.

सागर-सोनाली वाद आणि महिलांविषयी विधान

बाथरूमबाहेरील कॉमन एरिया जास्त वेळ वापरण्यावरून सोनाली आणि सागर यांच्यात वाद होतो. सोनाली सांगते की, बाथरूमच्या बाहेर कोणी जास्त वेळ बसलं तर महिलांना अस्वस्थ वाटतं. चर्चा झाल्यानंतर दोघेही वाद मिटवतात. सागर सांगतो की, तो गेली 10 वर्षे महिलांची भूमिका करत असल्याने महिलांच्या भावना त्याला कळतात.

सागर कारंडेचा डबल गेम? ‘टोळी’चा विस्तार

आजच्या भागात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सागर कारंडेचा डबल गेम. Bigg Boss Marathi 6 घरातील ‘टोळी’ आता फक्त चार जणांची न राहता आठ जणांची झाल्याचं सागर सांगतो. सागर आणि दीपाली गुपचूप खलबतं करताना दिसतात.

सागर विशाल आणि रुचिताला सांगतो की, तो आणि दीपालीही आता टोळीचा भाग आहेत, पण ही गोष्ट इतर सदस्यांना किंवा बिग बॉसलाही कळता कामा नये, असा इशाराही तो देतो. यामुळे सागरचा गेम संशयाच्या भोवऱ्यात अडकतो.

सचिनचा भावनिक क्षण: ओक्साबोक्शी रडला ‘खानदेश किंग’

बिग बॉस प्रभूला कन्फेशन रूममध्ये बोलावून त्याच्या गर्लफ्रेंडविषयी चर्चा करतात. त्यानंतर सचिनला बोलावलं जातं. सचिन कुटुंबाची आठवण काढत ओक्साबोक्शी रडतो. घरात एकटं वाटत असल्याचं, कॅमेऱ्यासमोर गोंधळल्यासारखं होत असल्याचं आणि स्मरणशक्ती कमी झाल्यासारखं वाटत असल्याचं तो सांगतो.

बिग बॉस सचिनचीच कहाणी सांगत त्याला समजावण्याचा आणि त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात. हा क्षण प्रेक्षकांच्या काळजाला चटका लावणारा ठरतो.

Bigg Boss Marathi 6 कॅप्टन्सी टास्क: पहिल्यांदाच दोन कॅप्टन!

बिग बॉस जाहीर करतात की, इतिहासात पहिल्यांदाच घरात दोन कॅप्टन असणार आहेत. प्रतिकात्मक बैलगाडा शर्यतीचा हा टास्क असतो. निळ्या आणि लाल बैलाच्या गळ्यात मानाची घंटा बांधायची असते.

पहिल्या फेरीत
सागर, सोनाली, सचिन Vs आयुष, करण, प्राजक्ता
यांच्यात सामना होतो. पझलमधील एक तुकडा लपवल्याने सागर आणि आयुषमध्ये जोरदार राडा होतो.

मात्र संचालकांचं बहुमत न झाल्याने ही फेरी रद्द ठरते आणि सहाही स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद होतात.

तन्वीचा नकार, टोळीची खेळी फसली?

यानंतर विशाल अनुश्रीकरवी तन्वीला शब्द देतो की, तिने पुढील फेरीत टोळीला साथ दिली तर पुढील आठवड्यात तिला कॅप्टन्सीसाठी मदत केली जाईल. मात्र तन्वी हा प्रस्ताव नाकारते. त्यामुळे टोळीची रणनीती धोक्यात येते.

पुढे काय?

आजच्या भागाने हे स्पष्ट केलं की,Bigg Boss Marathi 6  आता फक्त भांडणांचा खेळ न राहता रणनीती, डबल गेम आणि भावनांचा महासंग्राम बनला आहे. सागरचा डबल गेम उघड होणार का? सेवकांची भूमिका पुढे काय वळण घेणार? आणि दोन कॅप्टन कोण बनणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/delhi-high-courts-push-against-sameer-wankhedes-defamation-claim-against-aryan-khan-fatal-big-judgment-in-2026/

Related News