मुंबई :‘बिग बॉस 19’ मध्ये घरातील स्पर्धक आता त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करत आहेत. त्यातच अमाल मलिकनेही आपल्या कुटुंबाबाबत कटू सत्य समोर आणलं, ज्यामुळे मलिक कुटुंबातील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत.
अमालने जवळच्या मित्र बसीर अलीला सांगितलं की, अनू मलिकने त्यांच्या वडिलांना फसवलं. त्यावेळी अमालच्या आई गरोदर होती. अमाल म्हणाला, “वडिलांना गाणं रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओत बोलावलं. बाबा जे गाणं रेकॉर्ड करत होते, ते उदित नारायणच्या आवाजात वाजलं. अनूने पप्पांना असं दाखवलं की जणू तो त्यांना काम करण्याची संधी देत आहे, पण प्रत्यक्षात मॉक रेकॉर्डिंग झालं.”
अमालने आईवर झालेल्या अन्यायाचा देखील उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, “आई गरोदर असताना खूप समस्यांचा सामना केला. घरातील काम तिच्याकडून करून घेतलं जात असे. ती खूप सहनशील होती, तिच्यामुळेच आपण आज जिथे आहोत.”
गौहर खानने व्यक्त केला राग
अमालच्या या वक्तव्यांमुळे गौहर खानने देखील त्याच्यावर राग व्यक्त केला. गौहरने अमालच्या वर्तनावर आक्षेप घेतला आणि त्याला बिग बॉसच्या घरातून काढण्याची मागणी केली. तसेच, अभिषेक बजाजला बैलाच्या मेंदूचा मुलगा म्हणाल्याबद्दलही गौहरने तीव्र नाराजी व्यक्त केली.
अमाल मलिकच्या या खुलाशामुळे बिग बॉस 19 घरातील वातावरण आता आणखी तणावपूर्ण झालं आहे आणि चाहत्यांमध्ये देखील या चर्चेला प्रचंड गती मिळाली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/jastach-sundar-samjateya-tila-sangoon-contress/