विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून
भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह
आहेत. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ सोडून
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तुतारी हाती घेणार आहे. भाजपचे इंदपूरमधील माजी आमदार
हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल
होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या
कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच
हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील
तुतारीचे स्टेटस ठेवले आहे. दुसरीकडे मुंबईत हर्षवर्धन पाटील
आणि त्यांची कन्या अंकीता पाटील यांनी शरद पवार यांची भेट
घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्ह ओक या निवासस्थानी त्यांची
ही भेट झाली. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे.
इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी
चिन्हाचे स्टेटस ठेवले आहेत. यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत
आता मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनीही
पितृपक्षानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करु, असे म्हटले होते.
त्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच हर्षवर्धन पाटील त्यांची
कन्या अंकीता पाटील यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर
ओक या निवास्थानी पोहचले. त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत
त्यांनी चर्चा केली. या चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
Read also: https://ajinkyabharat.com/chaitanya-maharajanna-bedya/