एसटी संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

एसटी

एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळ कंत्राटी चालकांची

भरती करणार. एसटी कामगारांच्या अकरा संघटनांच्या कृती समितीने 3

सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ऐन गणपती सणाच्या

Related News

पार्श्वभूमीवर एसटीचे कामगार संपावर गेल्याने गणपती जादा वाहतूक अडचणीत

येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील 251 पैकी

63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती.

तर 115 आगारामध्ये वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, दुपारी संपाची

व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

गणपतीच्या सणाला जर आरक्षित प्रवाशांना बसेस उपलब्ध नाही झाल्या किंवा

बस चालकांअभावी सुटल्या नाहीत तर एसटीच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो.

त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी प्रशासन वारंवार

संपकरी कर्मचार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.  प्रवाशांची सणासुदीमध्ये

गैरसोय करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. सर्वाधिक गैरसोय गणेश

भक्तांची होऊ शकते. सुमारे एक हजारएसटी बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून

आज रवाना होत आहेत. दुर्दैवाने संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बसेस उपलब्ध

न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या

उपस्थिती कामगार कृती समितीची बैठक होत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/air-india-flight-going-to-delhi-visakhapatnam-faces-bomb-threat/

Related News