राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.

येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल,

असे म्हटले जात आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी

Related News

राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील

दाखवण्यात येत आहे. आता नुकतंच राज्य मंत्रिमंडळाची बैठक

पार पडली. या बैठकीत सरकारने तब्बल 41 निर्णयांना मंजुरी

दिली आहे. यात राज्य सरकारने कोळी बांधवांसाठी एक मोठा

निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार

पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून अनेक महत्त्वांचे निर्णय

घेण्यात आले. या बैठकीत कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय

घेण्यात आला. राज्य सरकारकडून लवकरच आणखी एका

महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. नुकतीच या महामंडळाला

मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मच्छिमार आर्थिक विकास

महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. गोड्या

पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी

महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर कोळी

बांधवाकडून ढोलताशा वाजवून जल्लोष केला जात आहे. भाजप

कार्यालयासमोर अनेक कोळी बांधवांनी एकत्र येत जल्लोष साजरा

केला. यावेळी त्यांनी पारंपरिक ढोलताशा वाजवून आनंद साजरा

केला.

Read also: https://ajinkyabharat.com/gunaratna-sadavarte-will-contest-against-aditya-thackeray/

Related News