बिग बॉसच्या घरात मगरीची एंट्री! मेगा एलिमिनेशनचा इशारा, स्पर्धकांमध्ये वाढलं टेन्शन

बिग बॉस

Bigg Boss Marathi 6 या रिअॅलिटी शोमध्ये सध्या नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. घरातील वातावरण आधीच तापलेले असताना आता बिग बॉसने आणखी एक मोठा धक्का स्पर्धकांना दिला आहे. या आठवड्यात होणाऱ्या नॉमिनेशन टास्कमध्ये मगरीचा थरारक ट्विस्ट पाहायला मिळणार असून त्यानंतर मेगा एलिमिनेशनची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य सध्या दबावाखाली असल्याचे दिसत आहे.

अलीकडेच घरातून दोन मजबूत स्पर्धक बाहेर पडल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. सर्वप्रथम रुचिता जामदार यांचा प्रवास संपला आणि त्यानंतर गायिका प्राजक्ता शुक्रे यांनाही घराबाहेर जावे लागले. या दोन्ही सदस्यांना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना त्यांची अचानक झालेली एलिमिनेशन चर्चा विषय ठरली. त्यामुळे आता पुढे कोणाचा नंबर लागणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शोच्या नवीन प्रोमोमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक अनोखा आणि धोकादायक वाटणारा नॉमिनेशन टास्क जाहीर केला आहे. या टास्कमध्ये घरात मगरीचा सेटअप तयार करण्यात आला आहे. स्पर्धकांना या मगरीच्या तोंडाशी संबंधित टास्क पूर्ण करावा लागणार आहे. या टास्कदरम्यान जे सदस्य मगरीच्या तोंडी अडकतील ते थेट नॉमिनेशनच्या फेऱ्यात जाणार आहेत.

Related News

या टास्कमुळे घरातील सदस्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. कारण या आठवड्यात फक्त एकच नव्हे तर एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता बिग बॉसने स्पष्ट केली आहे. त्यामुळे मेगा एलिमिनेशनचा धोका प्रत्येकावर आहे.

प्रोमोमध्ये दोन स्पर्धकांमधील जोरदार वादही पाहायला मिळतो. प्रभू आणि सागर कारंडे यांच्यात टास्कदरम्यान जोरदार बाचाबाची झाल्याचे दिसते. या वादात प्रभू संतापून म्हणतो, “मी इथे भजे तळायला आलो नाही.” त्यावर सागरही चिडून प्रत्युत्तर देतो. तो म्हणतो, “तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन असं होणार नाही.”

या वादामुळे घरातील वातावरण आणखी तापल्याचे दिसते. दोघांचेही आवाज चढलेले असून बाकीचे सदस्यही हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशा परिस्थितीत टास्क अधिकच तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.

बिग बॉसने दिलेल्या मेगा एलिमिनेशनच्या संकेतामुळे घरातील सदस्य अक्षरशः घाबरलेले दिसत आहेत. कारण आतापर्यंत अनेकांनी मजबूत खेळी केली असली तरी एका चुकीमुळे त्यांचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सदस्य टास्क जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावताना दिसणार आहे.

या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढवली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रेक्षकांनी सागर कारंडे प्रभूला घाबरत असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी घरातील काही सदस्यांना बाहेर काढण्याची मागणी केली आहे.

काही चाहत्यांनी विशेषतः तन्वीला एलिमिनेट करण्याची मागणी केली आहे. तर काही प्रेक्षकांनी मजेशीर प्रतिक्रिया देत बिग बॉसने आधीच विजेता ठरवला असेल तर बाकी सदस्यांना पटकन बाहेर काढा आणि थेट ट्रॉफी विजेत्याला द्या, असेही म्हटले आहे.

या प्रतिक्रिया पाहता बिग बॉस मराठीच्या या सिझनबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अजूनही कायम असल्याचे स्पष्ट होते. प्रत्येक आठवड्यात नवीन टास्क, वाद, आणि एलिमिनेशनमुळे शो अधिकच रंगतदार होत आहे.आता या आठवड्यातील मगरीच्या नॉमिनेशन टास्कमध्ये कोण अडकणार, कोण सुरक्षित राहणार आणि मेगा एलिमिनेशनमध्ये कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रेक्षकांना आता पुढील भागाची मोठी प्रतीक्षा लागली आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/a-32-year-old-womans-body-died-due-to-the-fierce-struggle-and-pain-the-fierce-attack-of-the-stray-dog/

Related News