बिग बॉस म्हटले की ड्रामा, भावनिक क्षण आणि अनपेक्षित ट्विस्ट अपरिहार्यच! सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस 19’ मध्ये पुन्हा एकदा असाच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर आवेज दरबार याला शोमधून बाहेर पडावं लागलं असून यामागचं कारण अत्यंत धक्कादायक आहे. प्रेक्षकांच्या मते तो कमी मतांमुळे बाहेर पडला असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात त्याच्या कुटुंबीयांनीच त्याला शोमधून बाहेर काढलं, अशी माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर यासाठी कुटुंबाने निर्मात्यांना ठराविक भरपाई रक्कमही दिली असल्याचं समजतंय. बिग बॉसचे निर्माते आवेजची एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशी हिला वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे शोमध्ये आणण्याच्या तयारीत होते. याआधीच अमाल मलिक आणि बसीर अली यांनी आवेजवर अनेक रिलेशनशिपचे आरोप केले होते, ज्यामुळे घरात वाद आणि ड्रामा झाला होता. एका टास्कदरम्यान बिग बॉसनं दाखवलेल्या क्लिपमध्ये या चर्चेचा उल्लेख होता, ज्यामुळे आवेज भावनिक झाला आणि ढसाढसा रडला. त्याने सांगितलं की तो नगमा मिराजकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि कोणालाही फसवलं नव्हतं. या सततच्या ड्रामामुळे आणि खासगी गोष्टी टेलिव्हिजनवर येऊ नयेत म्हणून आवेजच्या कुटुंबानेच त्याला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसच्या नियमानुसार, जर एखादा स्पर्धक स्वतःहून बाहेर पडतो, तर त्याला निर्मात्यांना भरपाई रक्कम द्यावी लागते. त्यानुसारच आवेजच्या कुटुंबीयांनी ही रक्कम दिली. आवेज हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. त्याचा भाऊ झैद दरबार याने अभिनेत्री गौहर खानशी लग्न केलं आहे. ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये गौहर स्वतः आली होती आणि आवेजला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबाने अखेर शो सोडण्याचाच निर्णय घेतला.
read also:https://ajinkyabharat.com/mookabadhir-unulanchaya-chehiavar-phulla-anand/
