अकोला : शहराच्या बस स्थानक चौकातील मुख्य मार्गावरील भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडने विक्री काढला आहे.
हा भुयारी मार्ग तयार झाला तेंव्हा पासून भुयारी मार्गात पाणी, घाण साचलेलं असते. या ठिकाणी पाणी साचल्याने अपघातही होतात, आणि गाड्याही फसतात.
म्हणून या मार्गाची स्वछता करण्याची विनंती संभाजी ब्रिगेडने महापालिका आणि बांधकाम विभागाला केली होती.
मात्र हे आमच्या अखत्यारीत नसल्याचं दोन्ही विभागाने सांगितल्याने, हा मार्ग बेवारस झाल्याचा आरोप करत, मार्ग विक्री काढला आहे.
ज्या कोणाला घायचे असेल त्याने बोली लावावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडने नागरिकांना केले आहे.