भुसावळचा साजिद बागवान ठार, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश

पाच ठार, चार जखमी

मलकापूर  – मलकापूर तालुक्यात मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे येणाऱ्या महामार्गावर भानगुरा फाट्याजवळ काल (दि. 17 ) रात्री 11.15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये भुसावळ येथील साजिद अजीज बागवान (वय 30) याचा समावेश असून, तोच अपघातग्रस्त मारुती ईको कारचा चालक होता. तर एका मृतकाची ओळख पटलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती ईको कार (MH-46-EX-3120) ही मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे भरधाव वेगात येत असताना चालक साजिद अजीज बागवान याने निष्काळजीपणे वाहन चालविले. भानगुरा फाट्याजवळ आल्यानंतर त्याची कार समोरून चाललेल्या एका अज्ञात मोठ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडकली. धडक एवढी भीषण होती की कारचे पूर्ण चक्काचूर झाली आहे.या धडकेत चालक साजिद बागवान यासह आणखी एका उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर कारमधील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. या अपघातात जखमी
संतोष तेजराव महाले (वय अंदाजे 40, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)पंकज दिलीप गोपाळ (वय अंदाजे 22, रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर, जि. जळगाव)दीपिका विश्वास (वय अंदाजे 30, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल)टीना अजय पाटील (वय अंदाजे 45, रा. भुसावळ)व एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे.या घटनेबाबत अक्षय भास्कर सोनवणे (वय 22, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून एमआयडीसी मलकापूर पोलिस ठाण्यात अप क्र. 133/2025 नोंद करण्यात आला आहे. आरोपी मृत चालक साजिद बागवान याच्याविरुद्ध कलम 281, 106(1), 125(b) भारतीय दंड संहिता तसेच सहकलम 184 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सपोनि हेमराज कोळी, ठाणेदार पो.स्टे. एमआयडीसी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मपोहेकाँ नीता मारोती वाढे पुढील तपास करीत आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/punha-ekada-vip-gdyanch-pag-ha-question-aranwar/