अकोट – भूमी फाउंडेशनच्या वतीने अकोट येथील सेंट पॉल स्कूल मैदानावर काल ऐतिहासिक असा भव्य गरबा महोत्सव जल्लोषात संपन्न झाला. या महोत्सवात सुमारे ३०० पेक्षा अधिक ग्रुप आणि सोलो स्पर्धकांनी सहभाग घेतला. दास मोबाईल आणि दैनिक सत्य लढा यांच्या सहकार्याने लाखो रुपयांची बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात आली.या महोत्सवात उडान ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावत सोन्याचे नाणे जिंकले, तर राजलक्ष्मी ग्रुपला द्वितीय क्रमांक मिळून सोन्याचे नाणे बहाल करण्यात आले. इतर विजेत्यांना चांदीच्या प्रतिमा, मोबाईल, हेडफोन, पॉवर बँक आदी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही थेट सहभागातून बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्झापूरे, दैनिक सत्य लढा चे मुख्य संपादक सतीश देशमुख, सहसंपादक रविराज मोरे, उपसंपादक अथर्व देशमुख, छावा संघटनेचे अध्यक्ष शंकराव वाकोडे, विदर्भ केसरी चे संपादक अनिल मावळे, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे परीक्षक सागर गवळी व प्रतीक्षा गवळी होते. सूत्रसंचालन चंचल गुप्ता यांनी केले. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये भूमी फाउंडेशनचे अमोल पवार, जितेश गलांडे, प्रशांत बेराड, सुमेध खंडारे, संदेश चोंडेकर, स्मिता महल्ले, मीनाक्षी आडे, सचिन वानखडे, अनुप चांदणे, अगस्ती ठाकूर, भावना रेवस्कर, अजय तेलगोटे व कीर्ती कुमार पितांबरवाले आदी सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.या उपक्रमात योगदान देणाऱ्या स्पर्धक, मान्यवर, पत्रकार व प्रेक्षकांचे विशेष आभार संस्थेच्या अध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी मानले.
read also : https://ajinkyabharat.com/kambi-mahagava-japa-shaet-vidyarthayana-bhetavastu-deon-anokha-vaddivas-sajra/
