भुजबळांचे पुढचे पाऊल ठरले
मुंबई – मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, अशी मागणी करणाऱ्या हैदराबाद गॅझेटच्या विरोधातील जनहित याचिका मुंबई हाय कोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका विनीत धोत्रे यांनी दाखल केली होती.कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितले की, जनहित याचिका नको; रिट याचिका दाखल करा. यावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भुजबळ म्हणाले, “आम्ही आधीच ४-५ रिट याचिका केल्या आहेत. आता जीआर मागे घ्या किंवा त्यात सुधारणा करा, असा आमचा आग्रह आहे. आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे.”भुजबळ म्हणाले की, आरक्षणाचा पाया आर्थिक नाही, तर सामाजिक मागासलेपणावर आहे. ओबीसी समाज अनेक जातींचा समूह आहे आणि आमची सुद्धा पुढची पिढी विचारात आहे.राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय आणि सामाजिक वाद उभा राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/kiran-mane-mahanatat-samajun-ghatalayanantar-me-yavishi-khup-vai-jhalo/
