भीमनगर जुने शहरात गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व प्रज्ञावंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
अकोला – अकोल्याच्या जुने शहरातील भिमनगर येथील रमाबाई चौकात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा,
खेळाडू व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण प्रज्ञावंतांचा गौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी
संदीप शिरसाट उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे
आणि नवचैतन्य निर्माण करणे हा या सोहळ्याचा उद्देश होता.
दहावी, बारावीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह विविध
क्षेत्रात यशस्वी खेळाडू व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्यक्तींना गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला.
Read also : https://ajinkyabharat.com/contract/