भावना पब्लिक स्कूलमध्ये विशेष दंत तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

भावना पब्लिक स्कूलमध्ये विशेष दंत तपासणी शिबिरा

पातूर – भावना पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या दंतआरोग्य संवर्धनासाठी विशेष दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शाळेचे संस्थापक अमोल सोनवणे सर आणि संचालिका सरीता तायडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सरोज सुरवाडे  यांच्या नेतृत्वात हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात एकूण २५० हून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दातांमध्ये केरीज (कॅविटी), हिरड्यांचे आजार, दुधाचे व कायमचे दात याची तपासणी केली गेली. योग्य दात घासण्याची पद्धत प्रात्यक्षिकासहित समजावण्यात आली, तसेच दररोज सकाळ-संध्याकाळ दात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

 प्रमुख उद्दिष्टे:
 विद्यार्थ्यांमध्ये दंतआरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे
 केरीजचे लवकर निदान
 नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे
 पालक व शिक्षकांनाही योग्य माहिती पोहोचवणे

 शिबिराचे मार्गदर्शन व तपासणीचे कार्य डॉ. शुभम रमेश लामगे व डॉ. नूतन शुभम लामगे (पंचवासू मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक, पातूर) यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य आहार, गोड पदार्थांचे दातांवर होणारे दुष्परिणाम, आणि दंतस्वच्छतेसाठी आवश्यक काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांनी डॉक्टरांचा स्मृतिचिन्ह व सत्कार करून धन्यवाद केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंतस्वच्छता व आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली असून भावी काळात अशा शिबिरांचे विस्तार करणे शाळेचे लक्ष्य आहे.