भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

अकोट (प्रतिनिधी):

केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या

NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,

Related News

भाऊसाहेब पोटे विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

NMMS परीक्षेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणून सक्षम नागरिक बनवण्याचा उद्देश आहे.

या पार्श्वभूमीवर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नावीन्यपूर्ण सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सचिव सन्माननीय डॉ. मेघनाताई पोटे यांनी भूषवले.

प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य पी. बी. रावणकार, प्रा. संदीप बोबडे, प्रा. एन. एम. भावे, संस्था संचालक अमोल तळोकार,

ज्येष्ठ शिक्षिका अर्चना उबाळे, पर्यवेक्षक श्री. पी. एम. गावंडे यांची उपस्थिती होती.

या वेळी NMMS परीक्षेत जिल्ह्यातून तिसरी आणि तालुक्यातून पहिली येण्याचा मान पटकावणारी विद्यार्थिनी

कु. श्रद्धा गजानन कांगळे, तसेच कु. राधिका मुरलीधर पांडे, कु. राधिका गोपाल खराटे, कु. मधुरा मनोज मानकर,

कु. समीक्षा विठ्ठल सावरकर, कु. समृद्धी ज्ञानेश्वर कुले, श्याम श्रीकृष्ण हरणे, सिद्धेश अनिल वडाळ,

अक्षरा संतोष पडोळे, प्रणव तिव्हाणे, प्रणव वालशिंगे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि संपूर्ण शाळा परिवाराने

अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related News