आदमपूर | प्रतिनिधी
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी लष्करी कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील आदमपूर
एअरबेसवर भेट देऊन जवानांचा उत्साह वाढवला आणि देशवासीयांना थेट संदेश दिला.
आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट इशारा दिला – “भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांचं एकच परिणाम होईल – तबाही, विनाश आणि महाविनाश.”
या वक्तव्यामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि लष्करी संकल्प यांचं स्पष्ट आणि ठोस दर्शन घडलं आहे.
🇮🇳 ‘भारत माता की जय’ ही आत्म्याची हाक आहे
पंतप्रधान मोदी म्हणाले, “‘भारत माता की जय’ हा फक्त नारा नाही, ती देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या आत्म्याची हाक आहे.
तुमच्या शौर्यामुळे देशवासीयांचे मस्तक गर्वाने उंच झाले आहे. हे जयघोष मैदानातही घुमतो आणि मिशनमध्येही!”
ऑपरेशन सिंदूर – दहशतवादावर कडक प्रहार
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, पाहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेण्यात आलं,
आणि त्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.
“हे केवळ प्रतिशोध नव्हता, तर दहशतीच्या मुळावर घाव घालण्याचा आमचा निर्धार होता.
आता दहशतवाद्यांचे आका सुद्धा समजून गेलेत की भारतावर डोळा टाकणाऱ्यांचे परिणाम भयावह असतील,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
ड्रोन, मिसाइल आणि पाकिस्तानचे अपयशी डाव
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आदमपूरसह अनेक एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने सर्व डावे हाणून पाडले.
“पाकिस्तानचे ड्रोन, यूएव्ही, फायटर जेट्स आणि मिसाईल्स आमच्या संरक्षण यंत्रणेपुढे निष्प्रभ ठरले.
आपल्या टेक्नॉलॉजीने पाकिस्तानच्या झोप उडवल्या आहेत,” असं मोदी म्हणाले.
सुरक्षा धोरणात ठोस बदलांचा संकेत
पंतप्रधान मोदींच्या भाषणातून हे स्पष्ट होतं की भारत आता केवळ बचावात्मक नव्हे,
तर आक्रमक धोरण स्वीकारत आहे, जिथे दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून संपवण्याचा इशारा दिला जातो.
Read Also : https://ajinkyabharat.com/jivant-vijichya-tarela-sparsh-jhalyne-3-janavarancha-dirty/