भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे निधन

बाळापूर | प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघाचे निष्ठावान कार्यकर्ते व माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र खंडारे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या निधनाने पक्षाच्या कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून, तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खंडारे यांनी २००७ ते २०१० या काळात संपूर्ण बाळापूर तालुका पिंजून भारिप बहुजन महासंघाची पंचायत

समितीमध्ये सत्ता स्थापन केली होती. ते अत्यंत मनमिळाऊ, लढवय्ये, संयमी व अभ्यासू स्वभावाचे धुरंधर नेते म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या अंत्ययात्रेसाठी भरतपूर (ता. बाळापूर) येथे जिल्हाभरातून वंचित बहुजन आघाडी,

भारिप बहुजन महासंघ तसेच इतर मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

खंडारे यांच्या निधनामुळे केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही मोठी हानी झाली आहे,

असे अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी भावुक शब्दांत नमूद केले.