भारतावर टॅरिफ उलटं अमेरिकेलाच महागात पडणार

"ट्रम्पचा निर्णय अमेरिकेलाच चावला!"

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खतापूर्ण निर्णय, ट्रम्प अडचणीत!

अर्थशास्त्रज्ञ जेफरी सॅश यांची टीका :  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयावरून मोठा

वाद निर्माण झाला आहे. हा निर्णय अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का देणारा ठरणार असल्याची जोरदार टीका होत आहे.

कोलंबिया विद्यापीठाचे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सल्लागार जेफरी सॅश यांनी या निर्णयाला अमेरिकेच्या इतिहासातील

“सर्वात मूर्खतापूर्ण” पाऊल ठरवलं आहे. त्यांच्या मते, भारतावर टॅरिफ लावल्यानंतर ब्रिक्स देश (भारत, रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका) एका रात्रीत

एकत्र आले आहेत. या अनपेक्षित एकजुटीमुळे अमेरिकेला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

सॅश यांनी स्पष्ट केलं की, “या निर्णयाने भारताचा विश्वास तुटला आहे. भलेही ट्रम्प यांनी उद्या टॅरिफ हटवला तरी भारतीयांना आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे —

अमेरिकेवर विश्वास ठेवायचा नाही.”

दरम्यान, भारतावर कठोर कारवाई करताना अमेरिकेने चीनला मात्र सवलत दिली आहे.

चीनला टॅरिफच्या मुद्यावर ९० दिवसांची मुदत देण्यात आली, तर भारतावर थेट ५०% टॅरिफ लादण्यात आलं.

यामुळे भारत-चीनमधील संवाद आणि काही नव्या करारांना गती मिळाली आहे.

भारत अमेरिकेच्या अटी मान्य करेल की नाही, याबाबत संभ्रम असला तरी,

पर्यायी व्यापार मार्ग आणि अमेरिकन कंपन्यांवर प्रतिहल्ल्याची शक्यता भारताकडून विचारात घेतली जात आहे.

Read also :  https://ajinkyabharat.com/bahraich-hadlalam-bhavala-marlam/