स्पेन-स्वित्झर्लंडने F-35 फायटर जेट खरेदीस नकार अमेरिकेच्या 5व्या पिढीतील लढाऊ विमान F-35 ला मोठा धक्का बसला
आहे. भारतानंतर आता युरोपातील दोन महत्त्वाचे देश स्पेन आणि स्वित्झर्लंड यांनीही F-35 खरेदी करण्यास
स्पष्ट नकार दिला आहे.स्पेनने F-35B घेण्याऐवजी 25 युरोफायटर टायफून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून भविष्यातील
FCAS (Future Combat Air System) वर भर दिला आहे. यामुळे स्थानिक उद्योग,
रोजगार आणि तांत्रिक क्षमता वाढेल.
स्वित्झर्लंडने 2022 मध्ये 36 F-35A खरेदीचा निर्णय घेतला होता. परंतु वाढत्या किंमती आणि अमेरिकेने घातलेल्या टॅरिफमुळे
स्विस सरकार नाराज झाले आहे. महागाईमुळे करारातील खर्च वाढेल, असे अमेरिकेने स्पष्ट केल्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये हा सौदा
कमी करण्याची किंवा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.
लॉकहीड मार्टिनच्या F-35 वर अनेक देशांमध्ये “अमेरिकेच्या नियंत्रणाखालील मोनोपॉली” असल्याचा आरोप आहे. अपग्रेड,
सॉफ्टवेअर आणि ऑपरेशनल डेटा अमेरिकेच्या हाती असल्याने भविष्यात धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
भारतानेही फ्रान्ससोबत मिळून 120 KN इंजिन विकसित करण्याचा करार करून स्वदेशी फायटर जेट्सकडे
पाऊल टाकले आहे. यामुळे अमेरिका-भारत संबंधांमध्ये संरक्षण क्षेत्रात तणाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात.
Read also :https://ajinkyabharat.com/utsav-tanha-bairajacha-vyankatesh-balaji-schoolmadhyay-sjra-sajra/