भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ‘त्या’ आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार

भारतानं बांगलादेशला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 'त्या' आकडेवारीमुळं रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार

Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या

आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.

भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेटनं पराभूत केलं आहे.

भारतापुढं आता पाकिस्तानंच आव्हान आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाचवेळा लढत झाली आहे.

Related News

यामध्ये कोणता संघ वरचढ ठरलाय हे पाहिल्यास भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं.

पाकिस्ताननं भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 पैकी 3 सामन्यात पराभूत केलं आहे.

भारतानं पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केलं आहे. भारतानं 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतानं 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला साखळी सामन्यात पराभूत केलं.

मात्र, त्याच स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला.

भारत आणि पाकिस्तान दुबईत 28 वेळा आमने सामने आले. ज्यामध्ये पाकिस्ताननं भारताला 19 वेळा पराभूत केलं.

तर, भारतानं पाकिस्तानला 9 वेळा पराभूत केलं आहे.एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान 135 वेळा आमने सामने आले आहेत.

यामध्ये पाकिस्ताननं भारताला 73 वेळा पराभूत केलं. भारतानं पाकिस्तानला 57 वेळा पराभूत केलं आहे.

यावरुन पाकिस्तानचं वनडेमध्ये भारतावर वर्चस्व राहिल्याचं दिसून येतं. रविवारी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागल्याचं दिसून येतं.

MORE NEWS HERE

https://ajinkyabharat.com/shinde-kevala-malida-khanyavach-patit-kinara-margavaril-tadyanwarun-aditya-thakaranchi-tika/

Related News