आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ओमानविरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापतीला सामोरा गेला असून, सुपर फोरमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे.
भारतीय संघाने ओमानवर 21 धावांनी विजय मिळवत गटात हॅटट्रिक विजय नोंदवला. पण सामन्यादरम्यान 15 व्या षटकात हमीद मिर्झाच्या फटक्याचा झेल घेण्याच्या प्रयत्नात अक्षरचा तोल गेला आणि त्याच्या डोक्याला व मानेला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले आणि तो पुन्हा खेळात परतला नाही.
सामन्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी सांगितले की, अक्षर सध्या ठीक आहे. मात्र 20 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल की नाही हे स्पष्ट नाही. सामन्याला आता 48 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे, त्यामुळे त्याचा सहभाग संशयात आहे.
पर्यायी खेळाडू कोण?
अक्षर पटेलच्या दुखापतीबाबत लवकरच बीसीसीआय निर्णय घेणार आहे.
जर तो बाहेर पडला, तर रियान पराग किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते.
दोन्ही खेळाडू सध्या स्टँडबायमध्ये आहेत.
read also :https://ajinkyabharat.com/base-machine-and-root-machine/
