आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला दिलेला दारुण पराभव आता वादात बदलला आहे. सामन्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानच्या माजी कर्णधार मोहम्मद युसूफ (Yousuf Mohammed) चिडून सूर्यकुमार यादवला ‘डुक्कर’ असे संबोधले.
युसूफने एका टीव्ही शोमध्ये भारतावरही आरोप करत म्हटले, “भारत आपल्या फिल्मी दुनियेतून बाहेर पडू शकत नाही. ज्या पद्धतीने ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत – पंचांचा वापर आणि मॅच रेफरीमार्फत पाकिस्तानला त्रास देत आहेत – ही लाजिरवाणी बाब आहे.”
या घटनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आयसीसीमध्ये वाद निर्माण झाला. PCBने मॅच रेफरी अँडी पायकॉफ्ट यांना पाकिस्तानच्या पुढील सामन्यातून हटवावे, अशी मागणी केली, तर आयसीसीने हे स्पष्ट नाकारले.
दरम्यान, आशिया कप बहिष्काराची धमकीही पाकिस्तानने दिली, परंतु आर्थिक परिणामामुळे हा निर्णय घेणे अवघड ठरू शकतो. पीसीबी सूत्रांनुसार, आयसीसी प्रमुख जय शाह पाकिस्तानवर दंड ठोठावू शकतात, जो सहन करणे त्यांच्या संघासाठी कठीण ठरेल.
