भारताचा आकाशातील विजय : जगातील सर्वांत वेगाने वाढणारा प्रायव्हेट जेट बाजार

“आशियाचा नवा बादशहा कोण? उत्तर आहे भारत!”

 भारताने खाजगी विमान वाहतुकीत मोठी झेप घेतली असून, जगातील सर्वांत वेगाने वाढणारा प्रायव्हेट जेट बाजार म्हणून भारत उदयास आला आहे. या वाढीमुळे भारताने चीनला मागे टाकत आशियामध्ये सर्वाधिक प्रायव्हेट जेट मालक असलेला देश म्हणून आपली आघाडी पक्की केली आहे.२०२१ ते २०२४ दरम्यान भारतातील खाजगी विमान ताफ्यात तब्बल २५ टक्क्यांची वाढ झाली, तर त्याच काळात चीनच्या ताफ्यात जवळपास एक-तृतीयांश घट झाली. २०२४ अखेर भारताकडे ४९० हून अधिक प्रायव्हेट जेट्स आहेत, तर २०२९ पर्यंत ही संख्या ७०० च्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.भारताच्या अर्थव्यवस्थेतील मजबुती, वाढता उच्च व मध्यमवर्ग आणि कार्यक्षम व्यावसायिक प्रवासाची गरज यामुळे या क्षेत्रात विक्रमी वाढ होत आहे. खाजगी विमान उड्डाणांची संख्या तर गेल्या काही वर्षांत तब्बल तीनपट वाढून दरमहा २,४०० हून अधिक फ्लाइट्सपर्यंत पोहोचली आहे.भारताच्या या झेपेमुळे जागतिक खाजगी विमानवाहतूक क्षेत्रात देशाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/%e0%a5%b2-palcha-nave-paul-made-in-india-iphone-14-american/