भारताची 5 प्राणघातक शस्त्रे

 ज्यांचं नाव ऐकताच थरथर कापतात चीन- पाकिस्तान

 ज्यांचं नाव ऐकताच थरथर कापतात चीन- पाकिस्तान

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या सामरिक सामर्थ्याची दखल संपूर्ण जगभरात घेतली जात आहे.

पाकिस्तानच्या हल्ल्यांना ज्या पद्धतीने भारताने प्रत्युत्तर दिलं, त्याचं कौतुक जागतिक पातळीवर होत आहे.

“मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे स्वतःला अधिक बळकट केलं असून, आज भारत जगातील चौथा सर्वात शक्तिशाली लष्करी राष्ट्र ठरला आहे.

भारताकडे असलेली काही शस्त्रं अशी आहेत की, त्यांची नावं ऐकली तरी पाकिस्तान आणि चीनच्या अंगावर काटा उभा राहतो.

भारताकडील ही शस्त्रं फक्त रणांगणातच नव्हे, तर सामरिक दृष्टीनेही भारताला अजिंक्य बनवतात. पाहूया भारताची ती पाच शस्त्रं –

1) ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र


brahmos

भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या शस्त्रागारातील सर्वात घातक शस्त्र मानलं जातं.

ताशी तब्बल 3700 किमी वेगाने हे क्षेपणास्त्र लक्ष्यावर धडकतं. 290 ते 600 किमी रेंज असलेलं हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला चुकवून अचूक प्रहार करू शकतं.

पाकिस्तानाविरुद्ध झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2)अग्नी

भारताकडील सर्वात लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र म्हणजे अग्नि-5. 5000 ते 8000 किमी रेंज असलेलं हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र

ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट वेगाने (ताशी 29,401 किमी) अचूक हल्ला करतं. चीनसह आशियातील कोणताही देश या क्षेपणास्त्राच्या रेंजच्या बाहेर नाही.

3) आकाश क्षेपणास्त्र प्रणाली

आकाश

ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. एकाच वेळी 30 ते 45 किमी अंतरावरील कोणतंही लक्ष्य पाडण्याची ताकद यात आहे.

शत्रूचे लढाऊ विमान, ड्रोन, क्रूझ किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता आकाश प्रणालीत आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानकडून आलेले ड्रोन भारतीय सैन्याने याच प्रणालीद्वारे पाडले होते.

4) पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर

पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर

स्वदेशी बनावटीचं हे मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आता जीपीएस व आयएनएस तंत्रज्ञानासह अत्याधुनिक बनवलं गेलं आहे.

फक्त 44 सेकंदांत तब्बल 72 रॉकेट्स डागण्याची क्षमता पिनाकामध्ये आहे. लक्ष्यापासून फक्त 25 मीटर अंतराच्या त्रिज्येत हे रॉकेट्स अचूकपणे प्रहार करू शकतात.

रणांगणावर शत्रूच्या मोठ्या फौजा उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य पिनाकाकडे आहे.

5) राफेल लढाऊ विमान

राफेल लढाऊ विमान

भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील सर्वात प्रगत लढाऊ विमान म्हणजे राफेल. फ्रान्सकडून खरेदी केलेलं हे विमान अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.

हवेतून हवेवर व हवेतून जमिनीवर अचूक हल्ला करण्याची ताकद यामध्ये आहे. 150 किमी अंतरापर्यंत हे विमान अचूक निशाणा साधू शकतं.

त्यामुळे राफेलच्या उपस्थितीनेच शत्रूराष्ट्रांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं.

 या सर्व घातक शस्त्रांमुळे भारत फक्त पाकिस्तानच नव्हे, तर चीनलाही तगडी प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहे.

भारताने स्वतःला “डिफेन्स इम्पोर्टर”वरून “डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब” बनवलं असून, आज जगभरात भारताच्या लष्करी ताकदीचा दबदबा निर्माण झाला आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/akot-yehe-grand-kavad-procession-concluded-polysancha-tagda/