भंडारज बु येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस

भंडारज बु येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस

पातूर : शहरी भागातून नव्हे तर ग्रामीण भागातूनही मुली आता पोलीस दलामध्ये भरती होत आहेत .

पातुर तालुक्यातील भंडारज बु. येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र सुरवाडे कुटुंबातील मुलगी जयनंदनी सुरवाडे

ही पोलीस दलात भरती झाली आहे विशेष म्हणजे तिने भंडारज बु खुर्द येथे पहिलीच महिला पोलीस बनण्याचा बहुमान पटकावला आहे.

Related News

भंडारज बु या छोट्याशा गावातील राजेंद्र सुरवाडे यांची मुलगी जय नंदनी सुरवाडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा भंडारज येथे व माध्यमिक

एन.सी.सी. चे प्रशिक्षण पातुर येथील तुळसाबाई कावल विद्यालय येथे झाले असून पोलीस दलाचा कोर्स अकोला येथे करून तीने

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरती मारत यशाला गवसणी घातली.जयनंदनी ही भंडारज मधल्या प्रत्येक मुलीसाठी

एक प्रेरणास्थान ठरली आहे जयनंदिनीचा शाळेपासून ते पोलीस ट्रेनिंग पर्यंत प्रवास संघर्षमय होता, ती थांबली नाही झुकली नाही

कारण तिच्या पाठीशी होते वडिलांचे संस्कार आई वडिलांना चार मुलाचा शिक्षणाचा खर्च झेपावत नसताना त्यांनी जीवाचे रान

करून मुलांना शिक्षणाचे धडे दिले जयनंदिनी घरच्या परिस्थिती जाणीव ठेवून जिद्दीने आपले श्रेय गाठले त्याबद्दल गावामध्ये तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/aamdar-savarkar-yanchaya-godoun-madhe-aadhala-is-a-very-poisonous-snake/

Related News