पातूर नंदापूरात गणेशोत्सव मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार
पातूर नंदापूर : येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ व एकता गणेशोत्सव मंडळ या दोन मंडळांनी एकूण बारा दिवस गणपतीची स्थापना करून पूजा-अर्चना व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले.९ सप्टेंबर रोजी दोन्ही मंडळांनी आपल्या बाप्पाला निरोप दिला. सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ५ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात तरुण मंडळी व महिला मंडळींनी उत्साहाने नृत्य सादर केले. गावातील नागरिक, महिला मंडळे व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.रात्री १० वाजेपर्यंत मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, बीड जमादार चव्हाण तसेच सर्व पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांततेत पार पाडली.
read also : https://ajinkyabharat.com/gudhaghyayevadhya-panyyatun-shetakyanchaya-bandhawar-pohochle-panchnamyasathi/
