पातूर तालुक्यात डांबरी रस्त्यांची दयनीय अवस्था, अपघाताची भीती
पातूर – तालुक्यातील दिग्रस ते तुलंगा ते लावखेड, सूकळी फाटा ते चांन्नी, मळसूर ते सायवानी ते सुकळी गाव,
सायवानी ते चरनगाव ते अंबाशी, मळसूर ते पहाटसींगी या मार्गांवर डांबरीकरण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
ठिकठिकाणी मोठे खड्डे, पावसाळ्यात साचलेले पाणी आणि अपघात निर्माण होण्याची धोके वाढली आहेत.
वाहनचालकांना या मार्गांवर सुरक्षित प्रवास करणे अत्यंत कठीण झाले असून, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष दिलीप परनाटे यांनी रस्ते बांधकाम विभागाकडे दि. ९ जून 2025 रोजी अनेक लेखी तक्रारी दिल्या.
परंतु, काही महिन्यांनीही संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही.
यामुळे जिल्हा अध्यक्ष दिलीप परनाटे यांनी दि. २५ ऑगस्ट 2025 रोजी वाडेगाव ते चांन्नी रोडवरील दिग्रस फाटा येथे
मेन रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की,
संबंधितांनी तातडीने दखल घेतली नाही तर हजारो जनसमुदायासह आंदोलन करण्यात येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करावी, अशी मागणी नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी केली आहे.
Read also : http://ajinkyabharat.com/balpoa-san-kambi-mahagavat-excitement/