बिच, स्पा आणि पहाटे 5 वाजताची भेट… पलाश-मेरी प्रकरणात नवे फोटो समोर

पलाश

पलाश मुच्छलच्या नावावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. एका तरुणीसोबत त्याने चॅटिंग केल्याचा दावा करण्यात येत असून, सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे आरोप कितपत खरे आहेत, याबद्दल अजूनही अधिकृत काहीच समोर आलेले नाही. मात्र, चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या ‘मेरी डिकॉस्टा’चे फोटो आता व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे.

मेरी डिकॉस्टा कोण?

व्हायरल माहितीप्रमाणे मेरी डिकॉस्टा ही कोरियोग्राफर असल्याचे बोलले जात आहे.तिचे इंस्टाग्राम खाते प्रायव्हेट असून ती एका व्हिडिओमध्ये दिसल्याचे सांगितले जाते.सध्या सोशल मीडियावर फिरत असलेले फोटो ‘हीच ती मुलगी’ असा दावा करत शेअर केले जात आहेत.

पलाश-मेरी कथित चॅटिंग नेमकं काय?

काही स्क्रीनशॉटमध्ये पलाश एका मुलीशी बिच, स्पा, आणि पहाटे 5 वाजता भेटण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जातोय.या स्क्रीनशॉटच्या आधारे ही मुलगी मेरी डिकॉस्टा असल्याचा सोशल मीडियावर दावा.मात्र या चॅटिंगचे सत्य कितपत? — याबाबत कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर नाही.

Related News

स्मृती–पलाश लग्न स्थगित झाल्यानंतरच वाद?

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते.मात्र लग्नाच्या काही तास आधी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले.त्यानंतर काही तासांतच हे चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल होत गेले आणि विश्वासघाताचे आरोप सुरू झाले.

अधिकृत प्रतिक्रिया?

सध्या:

  • पलाश मुच्छल → प्रतिक्रिया नाही

  • स्मृती मानधना → प्रतिक्रिया नाही

  • स्क्रीनशॉट खरे असल्याचा पुरावा → नाही

म्हणून या प्रकरणावर अद्याप एकतर्फी दावेच सुरू आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/6-powerful-upcoming-electric-scooters-launch-soon-yamaha-aerox-e-and-suzuki-e-access-are-here-know-the-amazing-features/

Related News