मुंडगाव – वणी-वारुळा-मुंडगाव-तेल्हारा रस्त्यावर बंगाली बाभळीच्या काट्यांचा विळखा मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः रस्त्यावरून प्रवासी, शालेय विद्यार्थी, शेतकरी व वाहन चालक दररोज ये-जा करत असल्याने हे झुडपे गंभीर धोका ठरत होते.
नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या वतीने दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यकारी अभियंता जागतिक प्रकल्प बँक अकोट यांच्याकडे निवेदन वजा तक्रार दाखल करण्यात आली होती. या निवेदनात रस्त्यावर पसरलेल्या काटेरी झुडपांमुळे अपघाताचा धोका उभा राहिल्याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला होता. तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता अकोट यांनी दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी जेसीबीच्या साहाय्याने बंगाली बाभळीच्या काट्या काढण्यास कामाला सुरुवात केली आहे.
पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व काही ठिकाणी रस्त्यावर पसरलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा वळणावर आल्यावर अगोदर ओळख होत नसे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर होत होती. काही ठिकाणी कट्टरपणे रस्ता दिसत नसे, परिणामी वाहन शेतात घुसण्यासारखे अपघात झाले होते. नागरिकांनी अनेक वेळा दुर्दशा अनुभवल्याचे सांगितले होते.
नारी शक्ती एकता संघर्ष फाउंडेशनच्या संस्थापक राजकुमार वानखडे, अध्यक्ष संगीता प्रभे, उपाध्यक्ष हमिदा बि शेख अख्तर, सचिव डॉ. चंदा प्रभे, सहसचिव विद्याताई गावंडे, कोषाध्यक्ष कविता वानखडे, सह कोषाध्यक्ष उज्वला डोबाळे, सदस्य शुभांगी मोहीते, प्रणाली बिजेकर, सविता भागवतकर, छाया धोंडेकर, अंतकला जुमळे, अजय प्रभे, गजानन वारकरी, वर्षा फुसे यांचे संयुक्त सह्या असलेल्या निवेदनामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करत हे झुडपे काढण्यास सुरुवात केली.
सदर उपक्रमामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाṇाऱ्या सर्व प्रवाशांचे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच पुढेही स्थानिक प्रशासनाकडून रस्त्यांच्या देखभालीवर विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/warua-jilaha-parishad-shaet-class-4-and-teacher-1/