मुंडगाव : वणी–वारुळा–मुंडगाव–तेल्हारा रस्त्यावर बंगाली बाभळीच्या काट्यांचा विळखा मोठ्या प्रमाणात पसरल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने दि. ९ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता, जागतिक प्रकल्प बँक विभाग, अकोट यांच्याकडे निवेदन व तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची दखल घेत कार्यकारी अभियंता यांनी दि. १२ सप्टेंबरपासून जेसीबी लावून बंगाली बाभळीच्या काट्या काढण्यास सुरुवात केली आहे.सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आणि काही ठिकाणी रस्त्यावर पसरलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारकांना वळणावर समोर येणारे वाहन दिसत नव्हते. विशेषतः रात्री, वाहनांच्या दिव्यांच्या अभावामुळे धोका अधिक वाढत होता. काट्यांवर वाहन घासल्यास टायर फुटणे, संतुलन बिघडणे व गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. काही ठिकाणी वाहन शेतात घुसल्याने किरकोळ अपघातही झाले.गावकऱ्यांनी सांगितले की, संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेल्हारा व अकोट विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. नागरिकांच्या तक्रारीवर लक्ष देण्यासाठी नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले व आवश्यक ती कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.सदर तक्रारीनंतर बंगाली बाभळीच्या काट्यांना काढण्यास सुरुवात झाली असून, रस्त्याचे सुरक्षिततेचे प्रमाण वाढले आहे.निवेदनावर सह्या करणारे सदस्य: संस्थापक राजकुमार वानखडे, अध्यक्ष संगीता प्रभे, उपाध्यक्ष हमिदा बि. शेख अख्तर, सचिव डॉ. चंदा प्रभे, सहसचिव विद्याताई गावंडे, कोषाध्यक्ष कविता वानखडे, सहकोषाध्यक्ष उज्वला डोबाळे, सदस्य शुभांगी मोहीते, प्रणाली बिजेकर, सविता भागवतकर, छाया धोंडेकर, अंतकला जुमळे, अजय प्रभे, गजानन वारकरी, वर्षा फुसे.
read also : https://ajinkyabharat.com/baalapur-talukyati-gavakyancha-question/