बीडच्या उपसरपंचाने सांगितले धक्कादायक सत्य

सख्ख्या बायकोपेक्षाही जास्त प्रेम करूनही धक्कादायक शेवट

बीड  : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करणाऱ्या पूजा गायकवाडसाठी गोविंद बर्गेने केलेले प्रेम आणि त्यातले संघर्ष आता उघडकीस आले आहेत.

गोविंद बर्गे यांनी दीड वर्षांपासून पूजा गायकवाड याच्या प्रेमात पडून तिला मोठ्या प्रमाणात ऐवज दिला होता. आयफोन, प्लॉट, सोन्याचे नाणे, दागिने, बुलेट मोटरसायकल, शेतजमीन आणि तिच्या सासरेगावातील घर देखील त्यांनी पूजाला देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, इतकेही केल्यावरही पूजाने अचानक गोविंदशी बोलणे बंद केले.

गोविंदने आपल्या जवळच्या मित्र चंद्रकांत शिंदे यांना सांगितले की, “मी पूजाला माझ्या सख्ख्या बायकोपेक्षाही जास्त प्रेमाने जीव लावला आहे. इतके काही दिलं, तरीही तिने मला फसवलं आहे. तिला शेतजमीन द्यावी किंवा गेवराईचा बंगला नावावर करावा, नाहीतर तिने माझ्यावर खोटी बलात्काराची केस करणार असल्याचे धमकावले आहे.” गोविंद याचे म्हणणे आहे की पूजाने मागील आठ दिवसांपासून त्याचे सर्व कॉल ब्लॉक केले आहेत आणि त्याचा मानसिक त्रास वाढत चालला आहे.

आत्महत्येच्या अगोदर गोविंद बर्गे तुळजाभवानी कला केंद्रात पूजाला भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी मॅनेजरला पूजाला भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र पूजेसोबत भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी पूजाच्या आईला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु संवाद साधता न आल्यामुळे त्यांनी चारचाकी गाडीच्या आत बसून आत्महत्या केली.

ही घटना बीड जिल्ह्यात एक मोठा धक्का निर्माण करत असून, समाजात अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पोलिस तपास सुरु असून, गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमागील प्रत्यक्ष कारणे उघड करण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/mumbai-hyikartala-threatened/