सतर्क राहा… कतार, सौदी अरेबिया, इस्रायलमधील भारतीय नागरिकांना महत्वाच्या सूचना, थेट नंबर..

सतर्क राहा

सध्या मध्यपूर्वेत स्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत, तर इराणकडूनही थेट प्रत्युत्तर मिळत आहे. इराणमधील लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरू असून युद्ध अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संबंधित देशांमधील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. पॅलेस्टाइन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि UAE (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा प्रयत्न करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

कामानिमित्त दुबईमध्ये गेलेल्या पुणे जिल्ह्यातील १० नागरिक आणि पिंपरी-चिंचवड येथील इंदिरा कॉलेजचे ८० विद्यार्थी व ५ शिक्षक सध्या सुरक्षित आहेत, तसेच त्यांच्या व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आपत्कालीन संपर्क नंबर जाहीर केले आहेत. रामल्लाहसाठी +९७०५९२९१६४१८, दोहा (कतार) ००९७४-५६४७५०२, रियाध ००-९६६-११-४८८४६९७, अबू धाबी ८००-४६३४२ किंवा WhatsApp ९७१५४३०९०५७१, कुवैत +९६५६५५०१९४६, मस्कत ८००७१२३४ किंवा +९६८९८२८२२७०, जॉर्डन ००९६२-७७०४२२२७६, बगदाद +९६४७७१६५१११८५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

भारतीय नागरिकांनी गर्दीपासून दूर राहावे, वाहतुकीच्या सुरक्षित मार्गांचा वापर करावा, आपत्कालीन संपर्कांशी सतत संपर्क ठेवावा आणि तणावपूर्ण परिस्थितीत घराबाहेर जाणे टाळावे. या सूचना पालन केल्यास सुरक्षित राहण्यास मदत होईल.

Related News

या परिस्थितीत केंद्र सरकार आणि स्थानिक दूतावास सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती मदत तत्काळ उपलब्ध करत आहेत.

Related News