भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारने नवीन ऑनलाइन गेमिंग कायदा लागू करून पैशांच्या आधारावर
खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली आहे. याचा थेट परिणाम Dream11 वर झाला असून, कंपनीने भारतीय संघाच्या जर्सीवरील स्पॉन्सरशिप
करारातून माघार घेतली आहे.
आशिया कपच्या तोंडावर धक्का
ड्रीम11च्या माघारीमुळे आशिया कप सुरू होण्याआधीच टीम इंडियाला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. यामुळे BCCI ला तब्बल 119 कोटी रुपयांचे
नुकसान सहन करावे लागणार आहे.
BCCI ला दिली माहिती
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “ड्रीम11च्या प्रतिनिधींनी बीसीसीआयच्या सीईओ हेमांग अमीन यांना भेटून पुढे स्पॉन्सरशिप सुरू ठेवता
येणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे आशिया कपसाठी ते स्पॉन्सर राहणार नाहीत. लवकरच नवीन टेंडर काढले जाईल.”
दंड नाही आकारला जाणार
करारामध्येच अशी तरतूद असल्याने ड्रीम11वर कोणताही दंड आकारला जाणार नाही. कारण कंपनीचा मुख्य व्यवसाय सरकारी कायद्यामुळे प्रभावित झाला
आहे.
मोठा करार थांबला
2023 मध्ये Dream11 ने BCCI सोबत 3 वर्षांसाठी 358 कोटींचा करार केला होता. याआधी हा अधिकार बायजूजकडे होता. आता हा करार अकाली
संपुष्टात आला आहे.
क्रिकेटपटूंसोबत मजबूत ब्रँड
महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू Dream11 चे ब्रँडॲम्बेसिडर राहिले आहेत.
आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपपासून इंडियन सुपर लीग, प्रो कबड्डी, एनबीए आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघापर्यंत ड्रीम11ने आपला विस्तार केला होता.
Read also :https://ajinkyabharat.com/muslim-society/