BCCI कडून नवी निवड समिती जाहीर

BCCI

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुरुष, महिला आणि ज्युनिअर क्रिकेट संघांसाठी नवी निवड समिती जाहीर केली आहे.पुरुष संघाच्या निवड समितीत दोन नवे सदस्य दाखल झाले आहेत. 2007 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिलेला वेगवान गोलंदाज आरपी सिंह आणि भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख निवडकर्ते म्हणून अजित आगरकर यांच्यावरच जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.महिला संघाच्या निवड समितीची जबाबदारी माजी क्रिकेटपटू अमिता शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या यापुढे महिला निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतील.ज्युनिअर निवड समितीसाठीही माजी रणजीपटूंना संधी देण्यात आली असून ते अंडर-१९ आणि अंडर-२३ स्तरावरील भारतीय संघांची निवड करतील.या नव्या बदलांमुळे भारतीय क्रिकेटच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/43-dashalaksha-migrant-dijiyatra-benefits/