BCCI कडून तीव्र संताप व्यक्त

आशिया कप ट्रॉफी अचानक गायब… मोहसीन नक्वी काय करत होता?

 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावलं. मात्र, या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी घातलेला निर्लज्जपणाचा डाग आता चर्चेत आला आहे. भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, आणि त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स स्वतःच्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवले. या घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून BCCI ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल झालेल्या आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजयी धडाका कायम ठेवला. नियमानुसार, विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करायची होती. मात्र, BCCI ने राजनैतिक कारणास्तव पाकिस्तानच्या ACC अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, “ज्या देशाचे ACC अध्यक्ष आहेत, त्या देशाशी भारत सध्या युद्धस्थितीत आहे. त्यामुळे त्या देशाच्या प्रतिनिधीकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारू शकत नाही.” परंतु या नकारानंतर मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स हॉटेलमध्ये नेऊन ठेवले, ही कृती खेळाच्या भावनेच्या विरोधात असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “आम्ही ट्रॉफी घेण्यास नकार दिला, पण याचा अर्थ असा नव्हे की ती ट्रॉफी ते स्वतःच्या हॉटेलमध्ये नेतील! त्यांची ही वृत्ती असह्य आहे. त्यांनी तात्काळ ट्रॉफी भारताला परत द्यावी.” BCCI ने स्पष्ट केलं आहे की, “ही कृती क्रिकेटच्या आत्म्याच्या विरोधात असून ACC अध्यक्षांवर कठोर कारवाईची मागणी केली जाईल.” ट्रॉफी सादरीकरणावेळी भारतीय संघाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या  उपाध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयारी दाखवली. परंतु मोहसिन नक्वी यांना वगळल्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी “भारतीय संघाला ट्रॉफी देण्याची गरज नाही” असं वक्तव्य करत ती स्वतःकडे ठेवली.BCCI ने ACC ला अधिकृत निवेदन पाठवून नक्वी यांच्या वर्तनावर चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या घटनेमुळे रोष असून “क्रिकेट स्पिरिटला काळिमा” असे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचे सूर आहेत. भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप 2025 जिंकला. मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी स्वतःकडे ठेवली. BCCI ने तीव्र विरोध नोंदवत ACC कडे तक्रार दाखल केली. नक्वी यांच्या वर्तनावर लवकरच कठोर कारवाईची शक्यता.

फायनल सामना: भारत vs पाकिस्तान
स्थळ: दुबई इंटरनॅशनल स्टेडियम
विजेता: भारत
 BCCI ची मागणी: ट्रॉफी परत मिळावी आणि नक्वी यांच्यावर कारवाई व्हावी.

read also:https://ajinkyabharat.com/india-khechun-anala-vijayacha-grass/

Related News

Related News