BCCI Cash Prize Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत
(Champions Trophy 2025) जेतेपद पटकावलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या अंतिम सामना झाला.
या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला
Related News
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
सासरी आलेल्या महिलेचं घर जाळून टाकल्याची घटना विचित्र प्रकारे घडली आहे,
सावरा येथे भीषण आग; दोन जनावरांचा मृत्यू, घराची राख
आयसीसीने 19.50 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते.
त्यानंतर आता बीसीसीआयने देखील भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने पेटारा उघडला आहे.
बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने 58 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दिली जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर आयसीसीकडून मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा तीनपट
जास्त रक्कमेचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.
बीसीसीआयने काय म्हटलंय?
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने
(बीसीसीआय) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
ही बक्षीस रक्कम खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी, निवड समितीच्या सदस्यांना दिली जाईल.
भारत आणि न्यूझीलंडचा अंतिम सामना कसा राहिला?
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
यानंतर, त्याने अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी केली आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. यादरम्यान, डॅरिल मिशेलने 63 धावांची खेळी खेळली.
प्रत्युत्तरात, भारताने 49 षटकांत लक्ष्य गाठले. रोहितने अंतिम सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली.
श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत कोणाला किती रुपये मिळणार?
विजेता – 19.5 कोटी रुपये (भारत)
उपविजेता – 9.75 कोटी रुपये (न्यूझीलंड)
उपांत्य फेरी (पराभूत झालेला संघ) – प्रत्येकी 4.85 कोटी रुपये
पाचवे/सहावे स्थान – 3 कोटी रुपये
7वे/8वे स्थान – 1.2 कोटी रुपये