अकोल्याच्या बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा व डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नागरिकांना गैरसोई होत आहे .
या पार्श्वभूमीवर युथ मूव्हमेंट महाराष्ट्र, आणि एसआयओ बार्शिटाकळीच्या सदस्यांनी आमदार हरीश पिंपळे निवेदन दिलेये.
या दरम्यान, बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालय हे अनेक गावांसाठी आरोग्याचे मुख्य केंद्र असून
आवश्यक डॉक्टर व आधुनिक सुविधा नसल्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात जाणे भाग पडते.
ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात. या दरम्यान, ANC अँब्युलन्स,
बालरोग व अस्थिरोग विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर यांची तात्काळ नियुक्ती व्हावी, अशी ठाम मागणी केलीय.
यावर आमदार हरीश पिंपळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यांनी दिले.
यावेळी युथ मूव्हमेंट महाराष्ट्र अध्यक्ष एसआयओ बार्शिटाकळी अध्यक्ष यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/kavad-yatrakrita-jal-nannyasathi-janaya-vahanachi-todfod/