रविवार, दिनांक 20 जुलै 2025 रोजी बार्शीटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अकोल्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
सुमारे २५० ते ३०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अमोल जामनिक यांनी केले होते.
शिबिराचे प्रमुख उद् घाटक जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे होते, तर जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, वरिष्ठ नेते नईमुद्दीन शेख,
तमिज खान उर्फ गोबा सेठ, शुद्धोधन इंगळे, सुरेश जामनिक, अनिल धुरंधर, शहराध्यक्ष अजहर पठाण,
दिनेश मानकर, भास्कर सरदार, दादाराव जामनिक, गणेश गवई, बॉबी जामनिक, नागेश कांबळे,
अविनाश चक्रनारायण, मिलिंद करवते, सूरज इंगळे, रक्षक जाधव, शीलवंत ढोले, वकील जामनिक,
अमोल वकील जामनिक, अरविंद जामनिक, गिरधर राठोड यांनी परिश्रम घेतले.
यावेळी वंचितचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळवले.
स्थानिक नागरिकांनी शिबिराचे कौतुक करत वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक योगदानाचे अभिनंदन केले.