बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारव्यात मोठा अजगर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारव्यात मोठा अजगर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बार्शीटाकळी तालुक्यात दगडपारव्यात मोठा अजगर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बार्शीटाकळी तालुका – तालुक्यातील दगडपारवा येथे शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजता मोठा अजगर दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गावालगत असलेल्या धरणाच्या पाण्यामुळे परिसरात दाट झाडे व झुडपे वाढली असून येथे सापांचे वास्तव्य कायम असते.

सदर अजगर रस्ता पार करत असताना ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडला. काही वेळातच ही बातमी गावभर पसरली आणि परिसरात खळबळ उडाली.

वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, “अजगर हा बिनविषारी साप आहे. तो स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही, मात्र अती जवळ गेल्यास तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे दुरून पाहावे आणि घाबरण्याचे कारण नाही.”

अजगर नंतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आला असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/vis-varshanchi-with-sodun-yerunkar-bjp/