बार्शीटाकळी तालुक्यात आनंदाची लहर!

शाखा अभियंता अनिता भगत यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडून सन्मान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने शाखा अभियंता अनिता भगत यांचा गौरव 

बार्शीटाकळी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा रमाबाई आंबेडकर नगर शहीद स्मारक हॉल येथे भव्यपणे पार पडला. या कार्यक्रमात बार्शीटाकळी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता अनिता लक्ष्मणराव भगत यांना वर्ष 2025 साठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनिता भगत यांच्या कार्यक्षमता आणि सामाजिक योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला असून तालुक्यातून यावर भरभरून आनंद व्यक्त केला जात आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे एंड अजय भाऊ तापकीर (संपर्क प्रमुख महाराष्ट्र), मनोज भाऊ टेकाडे (महाराष्ट्र विद्यार्थी प्रमुख), रिया करंजकर (संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष), रेखा काळे (प्रबोधनकार), सुप्रिया जाधव (साहित्य तेज संपादक), अभिनेत्री रंजीता पाटील आणि सारिका कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या समारंभाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेखा जगदाने, पुनम सरदार, राष्ट्रीय संघटक पतंगराव बनसोड, महाराष्ट्र अध्यक्ष सुशांत कदम, मुंबई चिटणीस मधुकर निरभवने, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन पुजारी, सातारा जिल्हाध्यक्ष भानुदास सावंत, राज्य उपाध्यक्ष किरण सोनुने, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अजित सातपुते, बीड जिल्हा अध्यक्ष सुनीता बडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केली होती.

बार्शीटाकळी तालुक्यातील समाजमाध्यम आणि नागरिकांनी अनिता भगत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले असून, हा पुरस्कार त्यांच्या अथक परिश्रमांचे व योगदानाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे. पुढील काळातही त्यांच्या कार्याने समाजाची उन्नती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.