बारावीचा निकाल जाहीर

बारावीचा निकाल जाहीर – राज्याचा निकाल 91.88%; यंदाही मुलींचा बाजीगरपणा

पुणे | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला

असून यंदाचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.

मुलींची उत्तीर्णता 94.58% असून, मुलांचा निकाल 89.51% लागला आहे.

Related News

यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून त्यांची सरासरी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.

शाखानिहाय निकाल

  • विज्ञान – 97.35%

  • कला – 88.52%

  • वाणिज्य – 92.68%

  • व्यवसाय अभ्यासक्रम – 83.03%

  • आयटीआय – 82.03%

विभागनिहाय निकाल

  • कोकण – 96.74% (सर्वोच्च)

  • मुंबई – 92.93%

  • छ. संभाजीनगर – 92.24%

  • कोल्हापूर – 93.64%

  • अमरावती – 91.43%

  • पुणे – 91.32%

  • नाशिक – 91.31%

  • नागपूर – 90.52%

  • लातूर – 89.46% (सर्वात कमी)

विद्यार्थी संख्येचा आढावा

  • परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

  • त्यात 8,10,348 मुलं आणि 6,94,652 मुली सहभागी झाल्या.

  • 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली.

  • नियमित विद्यार्थी – 13,02,873 उत्तीर्ण (91.88%)

  • खाजगी विद्यार्थी – 83.73% उत्तीर्ण

  • पुनर्परीक्षार्थी – 37.65% उत्तीर्ण

  • दिव्यांग विद्यार्थी – 92.38% उत्तीर्ण

गैरप्रकार व चौकशी

  • परीक्षेदरम्यान 124 केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून त्यांची सखोल चौकशी होणार आहे.

  • 374 कॉपी प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर (214 प्रकरणं) आणि पुणे (45) मध्ये नोंद झाली.

निकालाची ऑनलाईन पाहण्याची प्रक्रिया

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल.

  • विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे पहिले नाव आवश्यक असेल.

  • गुणपत्रिका 6 मेपासून कॉलेजमध्ये उपलब्ध होणार.

  • पुनर्मूल्यांकनासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

  • पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये, निकाल सप्टेंबरमध्ये अपेक्षित.

निकालातील घसरण

  • गेल्या वर्षी (2024) निकाल होता 93.37%, तर यंदा तो घसरून 91.88% झाला आहे – म्हणजेच 1.49 टक्क्यांची घट.

Read Also : https://ajinkyabharat.com/pune-mahamargawar-tarunacha-jeevaghena-stunt/

Related News