बारामतीत ओबीसी समाजाची आक्रोशयात्रा

बारामतीत

बारामतीत लक्ष्मण हाकेचा शरद पवार आणि अजित पवारवर आक्रमक हल्ला; प्रकाश आंबेडकरांचा फोनवरून संदेश

बारामती – ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामतीत आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज ओबीसी मोर्चा काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. हाके म्हणाले की, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी समाज नाराज झाला आहे.

हाकेंच्या भाषणाच्या दरम्यान वंचित समाजाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकरांनी उपस्थित जनतेशी संवाद साधताना म्हटले की, “जबरदस्ती दिलेले आरक्षण स्वीकार्य नाही, आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल.”

मंडल आयोगाबाबत जोरदार टीका

लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर मंडल आयोगाबाबतही टीका केली. त्यांनी म्हटले, “मंडल आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झाला नाही; देशभर लागू झाला. शेकापच्या दि बा पाटील, बबनराव ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे, बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू केला.”

शरद पवारवर 400 संस्थांचे अध्यक्ष असल्याचे आरोप

हाके म्हणाले की, “कुटुंबाच्या बाहेर कारखाने किंवा आमदारकी-खासदारकी न जाणे हे नियम मोडून शरद पवार 400 संस्थांचे अध्यक्ष झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यास पात्र असायचा, मात्र यात खाडाखोड करून शरद पवार अध्यक्ष झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्षही शरद पवार झाले आहेत.”

अजित पवार आणि ओबीसी आरक्षणावर टीका

हाके यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “सत्ता आणि पैशाचा वापर करून मंत्रीमंडळात सत्ता सांभाळली जात आहे. पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी होती; आता जर ओबीसीचे आरक्षण पडले तर ‘डुप्लीकेट ओबीसी’ विरुद्ध ‘डुप्लीकेट ओबीसी’ अशी लढत होणार आहे.”

हाकेंचे भाषण आणि आंबेडकरांचा फोन यामुळे बारामतीत ओबीसी मोर्चा आणि आरक्षण विषयावर वातावरण तापलेले दिसत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/akolyatil-morna-ghat-ganesh-visarjanasathi-sajj/