मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा विराजमान!

देशभरात आज घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावरही

बाप्पा विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे फोटो

Related News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या X अकाऊंटवर टाकले आहेत.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील

बळीराजावरील विघ्न दूर व्हावं असं साकडं त्यांनी गणपती बाप्पाच्या

चरणी घातलं आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान समृद्ध व्हावे.

चालू वर्षी पाऊस चांगला झाला आहे. तसेच महायुती सरकारने

चांगल्या योजना आणल्या आहेत.अशा आशयाचं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

झेंडूच्या पिवळ्या फुलांची सुंदर सजावट करत बाप्पासाठी

करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिवत बाप्पाची

पूजा करत प्राणप्रतिष्ठा केली. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे चिरंजीव

आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही गणरायाची पूजा केली.

Read also: https://ajinkyabharat.com/yellow-alert-for-rain-in-many-places-in-the-state/

Related News