शेतीवर बँकेच्या कर्जामुळे संतोष पंजाबराव चेचरे निं घेतला गळफास..
चौहटा प्रतिनिधी… करतवाडी येथील रहिवासी असलेले संतोष चेचरे यांनी अनेक दिवसा आधी जिल्हा मध्यवर्ती बँक
चौहटाशाखा येथून शेतीवरकर्ज घेतलेले आहे . त्याचप्रमाणे बचत गटाचे सुद्धा कर्ज उचलले आहे.
आणि काही सावकारी पद्धतीचे सुद्धा कर्ज सदर शेतकऱ्याने घेतलेले आहे.
यांच्या पश्चात बराचसा आप्त परिवार आहे व त्यांना दोन मुली आहेत.
सततच्या नापकीमुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे सदर शेतकऱ्यांनीआत्महत्या केल्याचे समजते.
सदर शेतकरी हा अतिशय प्रामाणिक व गरीब स्वभावाचा होता .आणि कर्ज भरणारच आहे असे अधिकाऱ्यांना सांगत होता .
आतापर्यंत शासनाने सोसायटीचे कर्ज माफ होणार या आशेवरतो शेतकरी बसला.
परंतु शेवटी नाईलाजाने पुन्हा शेतकऱ्यांने सावकाराकडून कर्ज घेऊन सोसायटीचे कर्ज भरले आहे
व पुन्हा आज रोजी सुद्धा शेतकरी कर्जबाजारी होऊन शेतीची किस्तकाडी करत आहे.
संतोष पंजाबराव चेचरे यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gabbar-tax-protest-akot-municipal-palkever-prahar-janashakti-parshacha-morcha/