Bank Holiday December 2025 :डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना. या महिन्यात अनेक सण, स्थानिक उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका विविध राज्यांमध्ये एकूण 18 दिवस बंद राहणार आहेत. त्यापैकी 6 दिवस साप्ताहिक सुट्ट्या, तर उर्वरित विविध राज्यांतील सणांच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल.डिसेंबरमध्ये बँकेत चेक जमा करणे, डीडी तयार करणे किंवा कर्जाची कागदपत्रे पूर्ण करणे अशा कोणत्याही तातडीच्या कामांसाठी आधीच सुट्टीची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
डिसेंबर 2025 मध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहणार? (राज्यानुसार सुट्ट्या)
सण व उत्सवांच्या सुट्ट्या
1 डिसेंबर – इंडिजिनस फेथ डे (अरुणाचल प्रदेश)
Related News
3 डिसेंबर – सेंट फ्रान्सिस झेविअर उत्सव (गोवा)
12 डिसेंबर – पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवस (मेघालय)
18 डिसेंबर – गुरु घासीदास जयंती (छत्तीसगड), यू सोसो थम पुण्यतिथी (मेघालय)
19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिवस (गोवा)
24 डिसेंबर – ख्रिसमस ईव (मेघालय, मिझोरम)
25 डिसेंबर – ख्रिसमस (बहुतांश राज्ये)
26 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (मेघालय, मिझोरम, तेलंगणा), शहीद उधमसिंह जयंती (हरियाणा)
27 डिसेंबर – गुरु गोविंद सिंह जयंती (हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश)
30 डिसेंबर – यू कियांग नांगबाह दिवस (मेघालय), तामू लोसर (सिक्कीम)
31 डिसेंबर – नववर्ष स्वागत (मिझोरम, मणिपूर)
साप्ताहिक सुट्ट्या
रविवार : 7 डिसेंबर, 14 डिसेंबर, 21 डिसेंबर, 28 डिसेंबर
दुसरा शनिवार : 13 डिसेंबर
चौथा शनिवार : 27 डिसेंबर
बँका बंद असताना व्यवहार कसे कराल?
UPI, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग यांचा वापर करून सर्व आर्थिक व्यवहार करू शकता.
ATM मधून रोख रक्कम काढता येते.
बहुतांश बँकांच्या अधिकृत ॲप्स उपलब्ध असल्याने पैसे ट्रान्सफर, बिल पेमेंट, खाते पाहणी सहज करता येते.बँका सुट्टीवर असल्या तरी डिजिटल बँकिंगमुळे तुमचा कोणताही आर्थिक व्यवहार अडत नाही.
read also : https://ajinkyabharat.com/mistaking-it-for-milk-he-drank-drain-cleaner/
