अमेरिकेला मागे टाकणार भारत?
नवी दिल्ली –भारत-अमेरिका व्यापारयुद्धात ट्रम्प प्रशासनाने लावलेला तब्बल
५० टक्के टॅरिफ सध्या चर्चेत आहे.
मात्र याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही,
असा मोठा दावा E&Y (अर्न्स्ट अँड यंग) यांनी केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
E&Y च्या म्हणण्यानुसार, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून
२०३८ पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
अहवालातील महत्वाचे मुद्दे :
२०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था (PPP आधारावर) २०.७ ट्रीलियन डॉलर होईल.
२०३८ पर्यंत ही अर्थव्यवस्था ३४.२ ट्रीलियन डॉलर इतकी भव्य होऊन,
अमेरिका मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.
भारताचा वार्षिक सरासरी विकासदर ६.५ टक्के राहिला,
तर अमेरिकेच्या २.१ टक्के सरासरी दराला मागे टाकणे शक्य.
अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम केवळ ०.१% जीडीपी पर्यंत मर्यादित ठेवण्याची भारताकडे क्षमता.
तरुणाई हीच खरी ताकद
E&Y इंडियाचे चीफ पॉलिसी एडवायझर डी.के. श्रीवास्तव यांनी सांगितले की,
भारताची तरुण आणि स्किल्ड वर्कफोर्स,
मजबूत गुंतवणूक दर,
आधुनिक तंत्रज्ञान क्षमता
यांच्या जोरावर भारताला दीर्घकालीन आर्थिक वाढ साध्य करता येईल.
🇮🇳 २०४७ चे स्वप्न – विकसित भारत
अहवालात असे नमूद केले आहे की, योग्य धोरणात्मक पावले उचलली,
तर २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न वास्तवात उतरण्याची मोठी शक्यता आहे.
read also:https://ajinkyabharat.com/ulhasnagar-crime-news-shocking-ulhasnagar/
