दुबई: आशिया कप 2025 मधील सुपर 4 फेरीत बांगलादेशने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवून जोरदार सुरुवात केली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं, ज्याचे बांगलादेशने फक्त 1 बॉलआधी पूर्ण करून विजय मिळवला.
बांगलादेशच्या विजयाची कहाणी
बांगलादेशच्या विजयामध्ये ओपनर सैफ हस्सन आणि तॉहिद हृदॉय यांची प्रमुख भूमिका होती. सैफने 45 चेंडूत 61 धावा केल्या (4 सिक्स, 2 फोर) तर तॉहिदने 37 चेंडूत 58 धावा (4 सिक्स, 2 फोर) केल्या. कॅप्टन लिटन दास 23 आणि शमीम हौसेन नाबाद 14 धावांसह योगदान दिलं. या खेळीत विजयासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत तणाव कायम होता.
श्रीलंकेसाठी वानिंदु हसरंगा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर नुवान तुषारा आणि दुष्मंथा चमीरा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
पहिला डाव – श्रीलंकेची खेळी:बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी बोलावलं. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 168 धावांची खेळी केली. दासुन शनाका नाबाद 64 धावांनी संघाचा आधार राहिला. कुसल मेंडीस 34, पाथुम निसांका 22, कॅप्टन चरिथ असलंका 21 आणि कुसल परेरा 16 धावा करत चमक दाखवली.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी सामना हातातून जाण्यापासून रोखत, मुस्तफिजुर रहमान 3, महदी हसन 2 आणि तास्किन अहमद 1 विकेट घेऊन विजय सुनिश्चित केला.
सुपर 4 मध्ये महत्त्वाची सुरुवात:बांगलादेशने या विजयासह 13 सप्टेंबरला झालेल्या पराभवाची परतफेड केली, जेव्हा श्रीलंकेने बांगलादेशवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. आता बांगलादेश सुपर 4 मध्ये आत्मविश्वासाने पुढे आहे.
read also :https://ajinkyabharat.com/utnababat-worry-raheel/
