67 लाखांचे दागिने, अडीच लाख रोकड; बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांचा धक्का देणारा छापा
पुणे – आयुष कोमकर प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांनी मोठा छापा टाकला असून तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि जमिनीच्या व्यवहाराच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आंदेकर टोळीचा या कारवाईत समावेश असून, त्याच्या मुली वृंदावनी वाडेकर आणि तिच्या मुलं स्वराज व तुषार यांच्या घरातूनही १६ मोबाईल, २१ हजारांची रोख रक्कम, दागिन्यांच्या खरेदी पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असून, अद्याप पाच आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या कारवाईत बंडू आंदेकरच्या घराभोवती २५हून अधिक कॅमेरे लावण्यात आले असून, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.